रावेर

सावदा येथे सराफा दुकानाला आग, आगीत मोठे आर्थिक नुकसान

सावदा, ता.रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सावदा येथील महावीर चौकातील रिद्धी ज्वेलर्स या सराफा दुकानास सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने दुकानातील सोन्या – चांदीची दागिने जळून खाक झाल्याने सराफी दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

येथील बस स्थानकाच्या मुख्य रस्त्यावरील महावीर चौकात असलेल्या गौरव चंद्रकांत वानखेडे यांचे मालकीचे रिद्धी ज्वेलर्स या दुकानास ही आग लागली दुकान बंद असतांना अचानक ही आग लागली दुकानातून धुराचे लोट दिसू लागताच नागरिकांनी तिकडे धाव घेतली स्थानिकांनी लागलीच सावदा नगरपालिका अग्नी शामक दलास पाचारण करण्यात आले या यावेळी सुमारे एक तासाचे अथक परिश्रमा नंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले

अग्निशमन दल व सहकारी यांनी यावेळी परिश्रम घेत आग विझविली, दरम्यान यात लाखो रुपयांचे आर्थिक नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात असून यात शो रूम भस्मसात झाल्याची माहिती मिळत असून पंचनामा झाल्या नंतरच यातील नुकसानीचा अंदाज यणार आहे. आगीत दुकानातील फर्निचर सुद्धा जळून खाक झाले आहे मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी गॅस ची नळी लिकेस असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!