सावद्यात गादी भंडारला आग, गाद्या ,कापूस सह अनेक वस्तू जाळून खाक
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा येथील बस स्थानक परिसरात रोडवर असलेल्या गाडी भंडार ला अचानक आग लागली.
येथील बस स्थानक परिसरातील महामार्गालगत असलेल्या विश्वासुधा हॉस्पिटल समोरील भारत गादी भंडार ला आज दुपारी अडीच वाजता अचानक आग लागली व आगीत कापूस, गाद्या, कापूस पिंजण्याचे मशीन अशा बऱ्याच वस्तू जाळून खाक झाल्या. घटनास्थळी सावदा नगर पालिकेचे अग्निशामक बंब बोलाऊन आग विझविण्यात येत आहे . आग नक्की कशामुळे लागली. हे अद्याप समोर आलेले नाही.


