शेतातील कोरड्या हरभऱ्याला आग, हजारो रुपयांचा हरबरा जाळून खाक
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शेतात कोरडा झालेला हरबरा जाळून खाक झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील तळवेल शिवारातील शेतात सोमवार २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ३ वाजता घडली. अकस्मात हरभऱ्याला लागलेल्या आगीत ५५ हजार रुपये किमतीचे नुकसान झाल्याची वरणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र निवृत्ती सरोदे वय-४६, रा. तळवेल ता. भुसावळ. यांचे तळवेल शिवारातील शेत गट क्रमांक ४३५ मध्ये शेत असून या शेतात त्यांनी कापून ठेवलेला कोरडा हरभरा जमा करून ठेवला होता. दरम्यान कोणीतरी वाटसरूने रस्त्याने जाताना बिडी किंवा सिगरेट पिऊन पेटते सिगरेट हवे फेकल्याने या हरभऱ्याच्या ढिगाराला अचानक आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे ५५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात राजेंद्र निवृत्ती सरोदे यांनी दुपारी १ वाजता वरणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
