मुक्ताईनगरात अज्ञातांकडून गोळीबार व जीवघेणा चाकू हल्ल्यात १ गंभीर जखमी, १ लाखांची लूट
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज अक्षय काठोके | मुक्ताईनगर मध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून व्यावसायिकांवर गोळीबारात व चाकू हल्ल्यात केल्याने एक जण गंभीर जखमी झाला असून दोन जण चाकू हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी १ लाख रुपयांची लूट करण्यात आल्याची खात्री लायक माहिती मिळत असून तशी चर्चा परिसरात जोर धरत असून या अचानक झालेल्या गोळीबाराने मुक्ताईनगर मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर येथील व्यापारी रमेश देवचंद खेवलकर, मंगेश रमेश खेवलकर व रवींद्र रमेश खेवलकर हे नेहमीप्रमाणे आपल्या व्यवसाय ठिकाणी मुक्ताईनगर मधील परिवर्तन चौकात असताना 19 /12 /2024 गुरुवारी रात्री 10.30 चे दरम्यान तीन ते चार अज्ञात लोकांनी येऊन पैसे असलेली पिशवी हिसकवण्याचा प्रयत्न करत असता या वेळी झटापट झाल्यामुळे आरोपींनी मंगेश खेवलकर यांच्यावर एक गोळी झाडली व पोटात चाकू खुपसला यात ते गंभीर जखमी झाले.
तर रमेश खेवलकर व रवींद्र खेवलकर यांच्यावर चाकु हल्ला झाल्यामुळे ते किरकोळ जखमी आहेत. त्यातील दोन हल्लेखोर काळ्या रंगाच्या नंबर नसलेल्या बुलेट ने व दोन हल्लेखोर दुसऱ्या मोटर सायकल ने पैशांची पिशवी घेऊन पसार झाले. या पिशवीत सुमारे १ लाख रुपये असल्याची खात्रीशीर माहिती मिळत असून परिसरात तशा चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, जखमींना जळगाव व नंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले .तर रमेश खेवलकर व रवींद्र खेवलकर यांच्यावर चाकु हल्ला झाल्यामुळे ते किरकोळ जखमी आहेत. घटनास्थळी डी. वाय. एस.पी राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी भेट देऊन पाहणी केली.
मुक्ताईनगर मध्ये नेहमीच गुन्हेगारी घटना घडत असतात. मुक्ताईनगर मध्ये गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा उमेदवारावर गोळीबार झाला होता.