दिल्ली हादरली! वकिलाच्या वेशात आले गँगस्टर; न्यायालयाच्या परिसरातच गोळीबार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशाची राजधानी दिल्लीत न्यायालयाच्या परिसरातच कुख्यात गुंडाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. रोहिणी न्यायालायच्या परिसरात भरदिवसा घडलेल्या या घटनेनं दिल्ली हादरली.
न्यायालयाच्या परिसरातच झालेल्या गँगवारने राजधानी दिल्लीत खळबळ उडाली. दिल्लीतील रोहिणी न्यायालयाच्या परिसरात झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. यात दिल्ली पोलिसांसाठी मोस्ट वाँटेड असलेल्या जितेंद्र गोगीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गोळीबाराच्या या घटनेत तीन ते चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत. गोगीला सुनावणीसाठी न्यायालयात आणण्यात आलं होतं. दिल्लीतील रोहिणी कोर्टात गोळीबार झालेल्या घटनेबाबत माहिती मिळाली आहे की, कुख्यात गुंड जितेंद्र गोगीला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टात अचानक फायरिंग करण्यात आली. जितेंद्र गोगीचा दोन हत्यारांनी मिळून एन्काऊंटर केला आहे. कोर्टात झालेल्या एन्काऊंटरच्या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ माजली आहे. जितेंद्र गोगीला मारण्यासाठी दोन मारेकरी वकिलाच्या वेशात आले होते. वकिलाच्या वेशात आल्यामुळे सुरक्षारक्षकांच्या तावडीतून सुटले. न्यायालयातील एका कार्यालयात गोगीवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये मारेकऱ्यांनी केलेल्या गोळीबारात गोगीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारत मारेकरी ठार झालेत. या गोळीबारात एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
रोहिणी कोर्टात झालेल्या गोळीबारात पोलिसांकडून झालेल्या फायरिंगमध्ये ३ मारेकरी ठार झाले आहेत. यामधील दोन हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. एकाच नाव राहुल असून तो वॉन्टेड होता त्यामुळे त्याच्यावर ५० हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तर दुसरा देखील वॉन्टेड होता हे दोन्ही गुंड टिल्लू टोळीचे असल्याचा संशय आहे.