भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

बोदवळमुक्ताईनगरराजकीय

ब्रेकींग : मुक्ताईनगरचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार

बोदवड, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि । मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांचा बोदवड तालुक्यातील राजूर गावात प्रचार रॅली सुरू असतांना आज दुपारी कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगर विधानसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेले आहे त्यातच मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी प्रचाराचा आजपासून शुभारंभ झालेला आहे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे हे बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती येथे प्रचाराचा शुभारंभ करून ते तालुक्यातील राजुरा येथे प्रचार रॅलीसाठी निघाले होते त्यांच्या ताब्यावरती अज्ञात हल्यकरांनी टू व्हीलर वरून येत गोळीबार केला सुदैवाने त्यांच्या गाडीवरून गोळ्या निघून गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेने बोदवड तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारमध्ये कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत असून मंडे टू मंडे न्युज ने अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!