भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

“गुलेन बारे सिंड्रोम” चा पहिला रुग्ण जळगाव जिल्ह्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात “गुलेन बॅरी सिंड्रोम” अर्थात (जीबीएस) (Guillain-Barré Syndrome) आजाराचा धोका वाढला आहे. या आजाराचे रुग्ण आता पुण्यासह मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपुरातही आढळून आले आहेत. “गुलेन बारे सिंड्रोम” (जीबीएस) ने आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आला आहे. विशेष म्हणजे कुठलीही “ट्रॅव्हल्स हिस्ट्री” नसताना मात्र एका ४५ वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत.

सध्या राज्यभरात जीबीएस आजाराचे थैमान सुरू आहे. असे असताना जळगाव जिल्ह्यात ही रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जळगाव तालुक्यातील एका ४५ वर्षीय महिलेला अशक्तपणा, अंगदुखी, खांदे दुखणे, पाठ दुखणे, अचानक चालण्यास- बसण्यास त्रास होणे अशी लक्षणे जाणवली. कुटुंबीयांनी गुरुवारी दि. ३० रोजी संध्याकाळी ५ वाजता तातडीने या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

सदर महिला कुठल्याही गावाला गेली नव्हती. त्यामुळे तिला ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही. तसेच, राहत्या घरीच हि अशक्तपणाची लक्षणे जाणवायला लागली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात आणल्यामुळे सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. न्यूरॉलॉजिस्ट डॉ. गोपाल घोलप, डॉ. अभिजित पिल्लई यांच्या देखरेखीखाली रुग्णाच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे,
नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढविणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

जीबीएस आजाराची लक्षणे व घ्यावयाची काळजी

  • अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा.
  • अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी.
  • डायरिया (जास्त दिवसांचा)
  • पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. पाणी उकळून घेणे.
  • अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
  • वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
  • शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!