एमपीडीए अंतर्गत जिल्ह्यातील पाच गुन्हेगार स्थानबद्ध, रावेर तालुक्यातील तिघांचा समावेश
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील सराईत पाच गुन्हेगारांना एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले असून त्यात रावेर तालुक्यातील तिघांचा समावेश आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी यांनी जिल्ह्यातील पाच गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. यात शेख तोसिफ शेख अफजल. वय २८ वर्ष. रा. रावेर. अयुब बशीर तडवी. वय ५७ वर्ष, रा. कुसुंबा. ता. रावेर. मगन मुरलीधर करवले वय ४३ वर्ष.रा. अटवाडे, ता. रावेर. तर मनोहर उर्फ मोहन कोळी. वय ४७ वर्ष. रा. लोहारी, ता. पाचोरा. किरण श्रावण कोळी. वय २८ वर्ष. भोलाणे ता. जळगाव. या गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.