फौजदार व पोलिसांसह पाच जणांनी घातला ग्रामसेवकाला १६ लाखांचा गंडा,जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l फौजदार दोन पोलिस व अन्य दोघं अशा पाच जणांनी ग्रामसेवकाला १६ लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली. पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी च १६ लाखांची फसवणूक करून लूट केल्याची घटना उघडकीस आल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवडा येथील ग्रामसेवक विकास मच्छिंद्र पाटील (४७ शांती नगर पाचोरा) यांची वर्षभरापूर्वी जळगाव मध्ये सचिन धुमाळ यांच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्या नंतर सोबत देवदर्शन ही झाले. विश्वास संपादन झाल्यावर त्या नंतर सचिन धुमाळ याने ग्रामसेवक विकास पाटील याना आपल्या कडे काही दिवसात पैसे तिप्पट करून देणारा माणूस असल्याचे सांगितले. त्यांच्या सांगण्या वरून लालासे पोटी ग्रामसेवक पाटील यांनी ग स पतपेढी तून १४ लाखांचे कर्ज काढून अधिक २ लाख मिळून असे १६ लाख रुपये घेऊन सोमवार दि. १६ रोजी दुपारी साडे चार वाजता पाटील याना जळगाव रेल्वे स्टेशन वर तिप्पट करून देणाऱ्या व्यक्तीस देण्या साठी बोलाविण्यात आले.
दरम्यान जळगाव येथे ठरल्या प्रमाणे रेल्वे स्टेशन वर गेले असता सोबत असलेल्या अहिरे नामक व्यक्ती ने
पैशांची बॅग घेतली व तो रेल्वे स्थानकातील जिना चढून जात असताना त्याच्या मागून तीन जाणं पोलिस गणवेशात येऊन त्यांनी निलेश अहिरे ला ताब्यात घेऊन त्याच्या कडून बॅग घेतली ते बॅग सह निघून गेले . त्या वेळी धुमाळ यांनी विकास पाटील यांना सांगितले की ते लोक पैसे धेऊन गेले आता आपल्याला काहीच करता येणार नाही. असे सांगत हात झटकले.
मात्र ग्रामसेवक विकास पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जळगाव पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार केली असता त्यात पोलिसच मास्टरमाईंड असल्याचे समोर आले. यात पोलिस मुख्यालयातील ग्रेडेड फौजदार प्रकाश मेढे पोलिस कर्मचारी योगेश शेळके,दुसरा पोलिस कर्मचारी दिनेश भाई व सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे यांनी हा बनाव रचल्याच उघडकीस आले.
पोलिसच निघाले मास्टरमाईंड व लुटारू
पोलिस कर्मचारी योगेश शेळके यानेच हे षडयंत्र रचले होते ग्रेडेड् पी एस आय प्रकाश मेढे हे पोलिस मुख्यालयात कार्यरत असून दिनेश भोई या पोलिस कर्मचाऱ्याला सोबत घेत त्यानेच ग्रामसेवक पाटील यांचे कडून सचिन धुमाळ यांचे मार्फत पैसे लुबळण्याचा कट रचला.
या प्रकरणी पोलिस मुख्यालयातील ग्रेडेड psi प्रकाश मेढे, पोलिस कर्मचारी योगेश शेळके, दुसरा पोलिस कर्मचारी दिनेश भाई व सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे याना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या कडून १६ लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.