क्राईममहाराष्ट्र

लग्नात पाहुण्यांना ‘बीफ’ ची मेजवानी, नवरदेवासह पाच जणांना अटक

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लग्नात पाहुण्यांना जेवणात गाईंची कत्तल करून गाईच्या मासाची (बीफ) मेजवाणी देणं नवरदेवाला भलताच महागात पडल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला. गाय कत्तल प्रकरणी नवरदेवालाच अटक केल्याने मोठी खळबळ उडाली.

भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना संध्याकाळच्या जेवणात मेजवानी देण्यासाठी तीन गाईंची निर्घृण कत्तल करण्यात आली. याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांना अटक करण्यात आली. गाईंची कत्तल केल्या प्रकरणी नवरदेव १)एजाज शहा, वय २१ वर्ष. या सोबत, २) शाकीर शेख वय २८ वर्ष. ३) मोशिन खान, वय २१ वर्ष. ४)शरीफ शेख, वय ३० वर्ष. ५) इझास निसार शहा, वय २१ वर्ष. अशा पाच जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील रहिवाशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे एजाज शहा, वय २१ वर्ष. याचे लग्न होते.या लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना गाईंच्या मासांची मेजवानी देण्यासाठी तीन गाईंची निर्घृण कत्तल करण्यात आली होती. या प्रकरणी नवरदेवासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना बीफची मेजवानी देणं मात्र नवरदेवाला खूपच महागात पडलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!