भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्रसामाजिक

वाहनांशी संबंधित नवीन नियमाचे पालन करा, अन्यथा १० हजार रुपयांचा दंड भरा! काय आहे नवीन नियम?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र सरकारने वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नवा नियम बनवला आहे. त्या नियमाची आता अंमलबजावणी करावी लागणार आहे तुम्हीवजर त्या नियमाचे पालन केले नाही तर त्या वाहन मालकांना दहा हजारांचा दंड भरावा लागणार आहे.

राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्या नुसार महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

१ एप्रिल २०२५ पासून लागू होणार असून या नियमानुसार, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वाहनांना ३१ मार्च २०२५ पर्यंत उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक असणार आहे. १ एप्रिल २०२५ पासून ज्या वाहनांवर ही नंबर प्लेट नसेल त्या वाहक चालकांवर १०,००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

HSRP म्हणजेच हाय- सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याचा हा नियम राज्यभरात लागू होणार आहे. या नियमानुसार जवळपास २० दशलक्षाहून अधिक वाहनांना ही नंबर प्लेट लावावी लागणार आहे. वाहन मालकांना सध्याच्या स्थितीत असलेली नंबर प्लेट बदलून हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावावी लागणार आहे. HSRP उपक्रमाचा उद्देश वाहनांची सुरक्षा वाढवणे आहे. ज्यामुळे चोरीला गेलेली वाहने परत मिळवला येतील.

नवीन वाहनांची बुकिंग केल्यानंतर ९० दिवसांच्या आत त्यांना ही नंबर प्लेट लावावी लागेल. प्रवासी वाहनांसाठी ७४५ रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये, दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.

HSRP च्या नंबर प्लेट विशेष प्रकारच्या ॲल्युमिनियम पासून बनवलेल्या असून या नंबर प्लेटवर परावर्तित रंग आहेत जे प्रकाशात सहज दिसतात आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सहज कॅप्चर होतात. या नंबर प्लेट्स युनिक आयडेंटिफिकेशन नंबर प्रदर्शित करतात.

HSRP चा रंग आणि फॉन्ट वैयक्तिक आणि व्यावसायिक वाहन यांच्यातील फरक जाणून घेण्यासाठी डिझाइन केले आहे. पांढरा, पिवळा आणि हिरव्या रंगात ही प्लेट तयार केली जाते. या क्रमांकांवर “इंडिया” असे देखील मुद्रित असते. याशिवाय निळ्या रंगात अशोक चक्र असते. ही नंबर प्लेट लावण्यासाठी वाहनाच्या आरटीओ कार्यालयानुसार एचएसआरपीची तरतूद करण्याचे काम तीन एजन्सींना देण्यात आले आहे. ते आधी अधिकृत वाहन पोर्टल वापरून वाहन तपशीलांची पडताळणी करतील. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) खूप महत्त्वाची आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!