भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमजळगाव

बेकरीतून मावा, टोस्ट व पिस्ता टोस्टचा २७९२ किलो वजनाचा साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

जळगांव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहिमे अंतर्गत बेकरीच्या तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. ग्राहकांच्या अनेक तक्रारी आल्याने जिल्हयातील सर्व हॉटेल्स, केक उत्पादक व विक्रेते, बेकरी अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते अशा आस्थापनांची येणारे नवीन वर्ष व नाताळ सणाच्या पाश्र्वभूमीवर बेकरी ची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हयात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ‍विशेष तपासणी मोहीमेअंतर्गत कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, यांचे पथकाने बुधवार ११ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरी यांचा पेढीच्या तपासणी (Unhygeinic Condition)मध्ये साठा करुन ठेवलेला मावा टोस्ट व पिस्ता टोस्टचा २७९२ किग्रॅ वजनाचा एकूण ३,३१,४४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या अन्न पदार्थावर पॅकींग तारीख तसेच बिलाचा उल्लेख नव्हता.

या मोहिमेअंतर्गत परवाना-नोंदणी, कामगारांचे वैदयकीय तपासणी अहवाल, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरलेल्या पाण्याचे अहवाल, कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण दिले आहे का? , सर्वसाधारण स्वच्छता, त्याप्रमाणे मुदतबाहय कच्चा माल व अन्नपदार्थांचा वापर होत आहे का? आदी बाबींची तपासणी केली जात आहे. याशिवाय बेक-यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेले तयार अन्नपदार्थ व अन्नपदार्थ बनविण्यासाठी वापरले जाणारे घटकपदार्थ रवा, पीठ, मैदा, तूप आदींचे नमुने यांची तपासणी करण्यात करण्यात येत आहे.

सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी कि. आ. साळुंके, के.एच.बाविस्कर, श.म.पवार यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोष कृ.कांबळे व सह आयुक्त,(नाशिक विभाग)  म.ना.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!