विविध उपक्रम राबवुन वन विभागाकडुन वसुंधरा सप्ताह साजरा
सुकळी, ता. मुक्ताईनगर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनक्षेत्रात वनविभागाकडुन विविध उपक्रम राबवुन वसुंधरा सप्ताह साजरा करण्यात आला. जागतिक वसुंधरा सप्ताह कालावधीत परीसरातील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणसह नदीप्रवाहालगत ची स्वच्छता, नैसर्गिक तलाव, पाणवठ्यांची स्वच्छता करणे यासारखे उपक्रम मोठ्या उत्साहाने राबविण्यात आले.
यासह पर्यावरण व सजिवसृष्टीचे महत्व सांगणारे व्याख्यान आणि परीसरातील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वडोदा वन परिक्षेत्रातील डोलारखेडा येथे वृक्षारोपणा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वृक्षारोपण पोलीस स्टेशनचे पो.निरी.नागेश मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वडोदा वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे ,डोलारखेडा वनपाल गणेश गवळी, वनरक्षक गोकुळ गोसावी,वनरक्षक रजनीकांत चव्हाण, वनमजूर अशोक पाटील. संजय सांगळकर. जयेश गरुड, मंगेश कोळीवाहन चालक महेंद्र पुरकर उपस्थित होते