ब्रेकिंग: चाळीस लाखांच्या बनावट नोटा चलनात, तुमच्या खिशातली नोट बनावट तर नाही ना?
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पन्नास रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी कारवाई केली. सांगली पोलिसांनी बनावट नोटांचा कारखाना उघड केला असून मिरजच्या अहमद शेख ला अटक केली आहे.हा कारखाना मिरज येथे सुरू होता.
पन्नास रुपयांच्या हुबेहूब चाळीस लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचं चौकशी मध्ये उघड झालं आहे. येथून दोन लाखांचा प्रिंटर व लॅपटॉप सुद्धा जप्त करण्यात आले असून या बनावट नोटा घेणाऱ्या एजेंट चा सुद्धा शोध सुरू आहे.या कारखान्यामागे अंतर राष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा कारखाना मिरज येथे सुरू होता. ही कारवाई सांगली पोलिसांनी केली. तसेच ७० रुपयांना बनावट १०० रुपये देत असल्याचे तपासात उघड झाले आहे.