क्राईममहाराष्ट्र

अल्पवयीन विद्यार्थिनींचे अश्लील फोटो माध्यमांवर केले व्हायरल, तीन अल्पवयीन मुलांना अटक

पुणे, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एक धक्कादायक घटना समोर आली असून दी. १६ जून ते ३० जून २०२४ दरम्यान तीन अल्पवयीन मुलांनी तीन अल्पवयीन विद्यार्थिनींची छायाचित्रे मार्फ करून ती अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित केल्याची संतापजनक प्रकार उघडकीस आला.

पुणे शहरातील एका नामांकित शाळेतील १६ वर्षीय मुलाने व त्यांच्या दोन मित्रांनी त्याच्या मोबाईल मधील ॲप द्वारे तीन विद्यार्थिनींचे अश्लील छायाचित्र तयार करून तिघा मित्रांनी ते सोशल मीडियावर प्रसारित केले. या संदर्भात विद्यार्थिनीच्या ३६ वर्षीय आईने हडपसर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलां विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!