सद्गुरु श्री शालिनी अंबिका शक्तीपिठाच्या संस्थापक परमपूज्यनीय सद्गुरु श्री शालिनी अंबिका आई अनंतात विलीन
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l सद्गुरु श्री शालिनी अंबिका शक्तीपिठाच्या संस्थापक परमपूज्यनीय सद्गुरु श्री शालिनी अंबिका आई अनंतात विलीन झाल्या.
याबाबत अधिकृत असे की शालिनी अंबिका शक्तिपीठ मुक्ताईनगर येथील परमपूजनीय सद्गुरु श्री शालिनी अंबिका आई या रविवार दिनांक 12/01/2025 दुपारी 4.30 वाजेला रेणुका चरणी विलीन झाल्यात त्यांची अंत्यदर्शन यात्रा सोमवार 13 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेपासून श्री रेणुका माता मंदिरापासून- तलाठी कार्यालय -बस स्टॅन्ड- प्रवर्तन चौक -आनंद ट्रेडर्स- तहसील रोड -झांबरे चक्की -आईचे जुने घर -बस स्टॅन्ड व रेणुका माता मंदिर याप्रमाणे निघेल नंतर अंत्यविधी संध्याकाळी चार वाजता श्री रेणुका माता मंदिर परिसर रेणुका नगर मुक्ताईनगर येथे होईल.