भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडाजळगाव

गांजा तस्करांसह साडे चार किलो गांजा जप्त

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गांजा तस्करी प्रकरणी २ तरुणांना अटक करून त्यांच्या जवळून ४ किलो ५०० ग्रॅम गांजा सह तब्बल २.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई चोपडा-शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहिती वरून शिरपूर येथून एक इसम मोटारसायकलवर गांजा विक्रीसाठी अकुलखेडा गावाजवळ जाणार आहे, त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व चोपडा शहर पोलिस यांचे संयुक्त पथक तयार करून सापळा रचला. त्यात पोलीसांनी विजय देवराम मोरे (वय २८, रा. भोरखेडा, ता. शिरपूर, जि. धुळे), अविनाश भिका पाटील (वय २६, रा. वाघळुद, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांना अटक करून त्या दोघांकडून ३६ हजार रुपये किमतीचा ४ किलो ५०० ग्रॅम गांजा, २ मोटारसायकली, २ मोबाईल आणि इतर मुद्देमाल असा एकूण २ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला विजय देवराम मोरे (वय २८, रा. भोरखेडा, ता. शिरपूर, जि. धुळे), अविनाश भिका पाटील (वय २६, रा. वाघळुद, ता. धरणगाव, जि. जळगाव) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे, पोउनि गणेश वाघमारे, पोउनि अनिल जाधव, पोह विलेश सोनवणे, दिपक माळी, रविंद्र पाटील, हेमंत पाटील, प्रदीप चवरे, जितेंद्र चव्हाण, गोकुळ सोनवणे, योगेश बोडखे आणि विनोद पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!