राष्ट्रीय महामार्गावर वाढदिवस साजरा करणाऱ्या भुसावळच्या चौघांना न्यायालयाचा दणका
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l २० एप्रिल रोजी मध्यरात्री भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी मधील चौघा तरुणांनी भुसावळ येथील क्रमांक आठ या राष्ट्रीय महामार्गावर साजरा केला त्या वेळी पोलिस उप अधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी या चौघांवर कायदेशीर कारवाई केली होती.य संदर्भात भुसावळ न्यायालयात दोषारोप पत्र सादर केल्या नंतर निखिल अनिलकुमार मुलचंदानी वय २१ वर्ष. साहिल मनोजकुमार डिसुझा. वय २१ वर्ष. रोहन मोहनलाल रमानी.वय २० वर्ष. हरेश सुंदरलाल सुंदराणी वय २१ वर्ष. सर्व राहणार सिंधी कॉलनी,भुसावळ या चौघांना भुसावळ न्यायालयाने शिक्षा सुनावत प्रत्येकी १२०० रुपये दंड सुनावला आहे.
दी.२० एप्रिल च्या मध्यरात्री पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे हे गस्तीवर असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ वर हे चौघे वाढदिवस साजरा करीत असल्याचे निदर्शनास आले असता पिंगळे यांनी या चौघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात भुसावल येथील बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असता भुसावळ न्यायालयाच्या न्या. एम आर बगाडे यांच्या कोर्टाने त्यांना प्रत्येकी १२०० रुपये दंड ठोठावला.