भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यनाशिक

पुण्यात चौथा ‘झिका’ रुग्ण, नाशिक शहरातही केली झिका व्हायरसने एन्ट्री

नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पुण्या नंतर आता आणखी एका शहरात झिका न एन्ट्री केली आहे. नाशिक शहरात झिकाचा रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग कामाला लागला आहे. पालिकेने ही माहिती लपवून ठेवली होती . त्यातच आता पुण्यातही चौथा झिका चा रुग्ण सापडला आहे. पुण्यातील मुंढवा भागातील तरुणाला झिका चा संसर्ग झाला आहे.महापालिकेकडून संशयित रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे.

आता नाशिक शहरात झिकाने एन्ट्री केली असून संगमनेर येथील व्यक्तीला झिका झाल्याचं समोर आले आहे.त्या व्यक्तीवर आता १५ दिवस उपचार केले जाणार आहेत. तसेच पालिकेने रुग्णाची माहिती लपऊन ठेवल्याची माहिती समोर आली आहे. या वरून पालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

कसा पसरतो झिका व्हायरस
झिका हा डासांपासून पसरणारा विषाणू,सामन्यात एडीस डास चावल्याने झिका चा संसर्ग होतो.

या आधी पुण्यात एरंडवणा येथील झिकाच्या रुग्णांपैकी पहिला रुग्ण हा ४६ वर्षीय डॉक्टर असून त्याच्या माध्यमातून त्याच्या १५ वर्षीय मुलीलाही याचा संसर्ग झाला आहे. सर्वप्रथम या डॉक्टरला ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची लक्षणे दिसून आली. स्वत: डॉक्टर असल्याने या व्यक्तीने स्वत:च्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी १८ जून रोजी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठवलेला. त्यांना झिकाचा संसर्ग झाल्याचा अहवाल २० जूनला मिळाला. यानंतर या डॉक्टरच्या मुलीमध्येही झिकाची सौम्य लक्षणे दिसून आली. तिच्या रक्ताचा नमुना २१ जूनला राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवला गेला. या चाचणीमध्ये या मुलीलाही झिकाचा संसर्ग झाल्याचेही स्पष्ट झालं. या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या दोघांच्याही संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली आहे. दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये अद्याप तरी झिकाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!