भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावरावेर

शेतकऱ्याची सव्वा दहा लाख रुपयांची फसवणूक, रावेर तालुक्यातील घटना

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील ४५ वर्षीय केऱ्हाळा या गावातील एका शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली. ही घटना १० ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. शेतकऱ्याला एका बँकेच्या नावाने ॲपचे लिंक पाठवून त्या मध्यामातून बँक खात्यातून १० लाख २४ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी १४ ऑक्टोबर सोमवार रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधता फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील केऱ्हाळा या गावातील रहिवाशी असलेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्याला १० ऑक्टोबर रोजी त्यांच्या व्हॉटसॲप मोबाईलवर एका अनोखळी नंबरवरून एका बँकेच्या नावाने एपीके फाईल पाठविण्यात आली. शेतकऱ्याने ॲपच्या लिंकला क्लिक केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेवून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर १० लाख २४ हजार रूपये अन्य खात्यात ऑनलाईन वळवून फसवणूक केली आहे.

खात्यातून पैसे गायब झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी यांनी सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता जळगाव सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!