भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

बंद क्रेडिट कार्ड सुरू करुन देण्याच्या नावाखाली एक लाख रुपयांची फसवणूक

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एका बांधकाम व्यावसायिकाचे बंद पडलेले क्रेडिट कार्ड सुरू करुन देण्याच्या नावा खाली एका तरुण भामट्याने बँकेत कामाला असल्याचे सांगून परस्पर १ लाख १३७ रुपये काढून घेतल्याची घटना जळगाव शहरात घडली. परंतु पोलिस स्टेशनला तक्रार दे असल्याचे सांगताच या तरुणाने ९७ हजार रुपये बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यावर जमा केले. उर्वरित रक्कम जमा न करता बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली.

बांधकाम व्यावसायिक विनोद हंसराज बडगुजर (४८, रा. इंद्रप्रस्थनगर) यांनी वर्षभरापूर्वी घेतलेल्या क्रेडिट कार्डचा वापर दोन महिन्यांपासून न केल्यामुळे ते कार्ड बंद पडले. कार्ड देणारा कपिल राजू पाटील (३१, रा. चंदू अण्णानगर) हा ४ ऑगस्ट रोजी बडगुजर यांच्या घरी गेला व त्याने तुमचे बंद पडलेले कार्ड जमा करण्यासाठी आल्याचे सांगून ते कार्ड घेतले. दिनांक ८ ऑगस्ट रोजी बँकेतून बडगुजर यांना फोन आला व क्रेडिट कार्डद्वारे एक लाख १३७ रुपये खर्च केल्याचे समजले.


आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बडगुजर हे पोलिस ठाण्यात पोहचले. त्यावेळी पाटील याने चौकशीत ९७ हजार रुपये क्रेडिट कार्डवर जमा केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र अजूनही तीन हजार १३७ रुपये जमा केले नाहीत. बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कपिल पाटील विरुद्ध दी. ९ आगष्ट रोजी जळगाव शहर पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. रवींद्र सोनार करीत आहेत

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!