भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

शेअर ट्रेडिंगच्या नावा खाली एक कोटी सहा लाखांची फसवणूक

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l सायबर ठगांनी शेअर ट्रेडिंग च्या नावाखाली शेअर मार्केट मध्ये मोठा नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून जळगाव येथील एका ४२ वर्षीय गृहस्थाला १ कोटी ६ लाख पाच हजार नऊशे पांच्यायेशी रूपयांचा गंडा घालून फसवणूक केली.

मूळ भोपाळ येथील रहिवाशी असलेले गृहस्थ सध्या जळगाव मधील भोईटे नगर मध्ये राहतात. १८ जुलै २०२४ ते २६ सप्टेंबर पर्यंत वेळोवेळी अंकित अग्रवाल व मिरा यांनी त्यांच्याशी सतत संपर्क साधत शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास प्रचंड मोठा नफा मिळेल,तुम्ही खूप पैसे कमवाल. असे पटऊन देत विश्वास संपादन केला.


त्या नंतर त्याने गृहस्थाला अलंकित लिमिटेड सिक्युरिटी स्टॉक लीग ग्रुप. एफ ६०८ अलंकित सिक्युरिटी कस्टमर सर्व्हिस टीम यात त्यांना ऍड केले. त्या नंतर सायबर सायबर ठगानी तक्रारदाराला एक लिंक पाठऊन अलंकीत नावाचे एप्लिकेशन्स डाऊनलोड करण्यासाठी सांगितले.

आता तुम्ही मोठा नफा कमवाल असे म्हणत गुंतवणूक करून नफा मिळावा असे ठगानी गृहस्थाला आमिष दाखविले. सुरुवातीला गृहस्थाने भरलेल्या रकमेवर ठगानी तुम्हाला ३५०० रुपये नफा झाल्याची थाप मारून नंतर त्यांच्या कडून ठगानी त्यांचे कडून १,०६,०५,९८५ ऑनलाईन नेटबँकिंग द्वारे वेगवेगळ्या बँक खात्यात त्यांनी रक्कमा स्वीकारल्या.परंतु त्या नंतर गृहस्थाला कोणताही परतावा दिला गेला नाही.

ग्रहस्थाने ठगवणाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गृहस्थाने सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.या प्रकरणी ठागांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!