डोंबिवली येथे लेवा यूथ फोरम, केंद्रीय संस्था व लेवा समाज पाटीदार मंडळ यांच्या तर्फे मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न
डोंबिवली, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दिनांक ०१ जून २०२५ रविवार रोजी डोंबिवली येथे लेवा यूथ फोरम डोंबिवली शहर व केंद्रीय संस्था आयोजित व लेवा समाज पाटीदार मंडळ यांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर लेवाभवन या ठिकाणी उत्साहात पार पडले. शिबिराची सुरुवात श्री गणपतीची आरती व भारत मातेची आरती करण्यात आली व तसेच छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन महिला डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आले.
आरोग्याची नवी दिशा निरोगी जीवनाची ग्वाही या प्रेरणादायी घोषवाक्याखाली आयोजित केलेल्या या महाआरोग्य शिबिरास डोंबिवलीकर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिरात सुमारे ६५० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला व विविध तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली व त्या संदर्भात सल्ला घेतला.
या शिबिरात एकूण २५ प्रमुख आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यात नाक-कान-घसा तज्ञ, हाडे-सांधे तज्ञ, नेत्रतज्ञ, दंत तज्ञ, त्वचा तज्ञ, लिव्हरतज्ञ, रक्तदाब तज्ञ, मधुमेह तज्ञ, ईसीजी, फिजीओथेरपी व कायरोथेरपी तपासण्या, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, न्यूरोलॉजी तज्ञ, हृदयरोग तज्ञ, कॅन्सर तज्ञ आणि पचनतज्ञ यांचा समावेश होता. तपासणीसाठी या शिबिरात विविध क्षेत्रातील अनुभवी व सुप्रसिद्ध डॉक्टरांनी सहभाग नोंदवला तसेच नागरिकांच्या प्रश्नांवरती योग्य प्रकारे मार्गदर्शनही केले.
या महाआरोग्य शिबिरास डॉ. राहूल चौधरी, डॉ. राहूल भिरुड, डॉ. निखिल भंगाळे, डॉ. रुचा एन. भंगाळे, डॉ. विशाखा जंगले, डॉ. सुमित फिरके, डॉ. सचिन फेगडे, डॉ. सिद्धेश पाटील, डॉ. हर्षल महाजन, डॉ. निलम एच. महाजन, डॉ. सागर चौधरी, डॉ. तेजस सावदेकर, डॉ. नीरज झांबरे, डॉ. भुवनेश पाचपांडे, डॉ. हिमाली पाचपांडे, डॉ. पंकज लढे, डॉ. कीर्ती लढे, डॉ. अमृता कोल्हे, डॉ. अनिकेत महाजन, डॉ. हितेंद्र पाटील, डॉ. विनया महाजन, डॉ. मनोज लोखंडे, डॉ. हरीश साळुंखे, डॉ. समीर लाड व राहूल चौधरी फाउंडेशन समस्त कर्मचारी वर्ग यांनी सहभाग घेऊन समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व डॉक्टर, स्वयंसेवक, आयोजक मंडळी तसेच सहभाग घेणारे नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री हर्षल भंगाळे, श्री अतुल महाजन, श्री किरण राणे, श्री सोहम कोल्हे, श्री आकाश धांडे, श्री दीपक पाटील, श्री मनोज महाजन, श्री संजय नेमाडे, श्री प्रवीण चौधरी, श्री मदन चौधरी, श्री तेजस चौधरी, श्री भावेश भोळे, श्री दिगंबर पाटील, श्री सुभाष राणे, श्री सतीश लोखंडे, श्री चेतन महाजन, श्री प्रफुल्ल पाटील, श्री चेतन महाजन, श्री विवेक राणे, श्री चेतन कोल्हे, श्री जीवन कोल्हे, श्री रोहित अत्तरदे, श्री सतीश कोल्हे, श्री योगेश पाटील, श्री हर्षल पाटील, श्री जितेश सावदेकर, सौ वैशाली फालक, सौ नयना धांडे, सौ माधुरी महाजन, सौ कविता पाटील, सौ मनीषा भंगाळे, सौ मेघना राणे, सौ मनीषा नेमाडे, सौ कीर्ती बोरोले तसेच संपूर्ण लेवा यूथ फोरम व लेवा समाज पाटीदार मंडळ डोंबिवलीचे सर्व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा