नशिराबाद येथे मोफत महाआरोग्य शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | श्री. मुकुंदाभाऊ रोटे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नव निर्माण सेना व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशिराबाद येथे मोफत महाआरोग्य शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर गुरुवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मनसे कार्यालय, वि. का. सोसायटी कॉम्प्लेक्स, आठवडे बाजार, नशिराबाद (ता. जि. जळगाव) येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध आजारांसाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे.
शिबिरामध्ये 2D Echo, ईसीजी, कार्डिओग्राफी तसेच रक्तदाब तपासणी आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच मुतखडा, मूत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट, पित्ताशयातील खडे, हर्निया, अपेंडिक्स, आतड्यांचे विकार, डायबेटिक फूट, थायरॉईड, टॉन्सिल, नाक-कान-घसा विकार, नेत्रविकार तसेच स्त्रीरोग व अस्थिरोग विभागातील विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला दिला जाणार आहे.
याशिवाय हृदयरोग तपासणी मार्गदर्शन, फिजिओथेरपी व फिजिओप्लास्टीसह आय.व्ही.सी. फिल्टर व बायपाससंदर्भातही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटक म्हणून श्री. मा. खा. डॉ. उल्हास पाटील (अध्यक्ष, गोदावरी फाउंडेशन) उपस्थित राहणार आहेत. तर विशेष प्रमुख अतिथी म्हणून श्री. डॉ. मा. आ. नेयपागे सावंत (महाराष्ट्र नव निर्माण सेना अध्यक्ष, मातोश्री प्राथमिक व माध्यमिक शाळा प्रबोधन संस्था) उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९३७३३५०००९.


