निवडणुकीपूर्वी घड्याळ चिन्ह गोठवा, शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या निवडणूक चिन्हाबाबतचा अजित पवार व शरद पवारांचा वाद सर्वोच्च न्यायालय सुरू आहे. या बाबत शरद पवारांच्या गटाने तत्काळ लवकरात लवकर निर्णय घ्या, येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुक लागणार असून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी घड्याळ हे चिन्ह गोठवा, अशी याचिका दाखल केली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविली होती. परंतु अनेक मतदारसंघांमध्ये तुतारी चिन्हांसारखे इतर चिन्ह असल्यामुळे शरद पवार गटाला त्याचा फटका बसल्याचे दिसून झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. त्या बाबत शरद पवारांच्या गटाने तक्रार केल्याने निवडणूक आयोगाने आता ही इतर चिन्हे गोठवली आहेत. या गोष्टीचा फायदा शरद पवार गटाला होऊ शकतो. परंतु
घड्याळ या चिन्हाचा फायदा अजित पवार यांना त्यांना होताना दिसत आहे. अद्याप घड्याळ हे चिन्ह कोणाचे यावर निर्णय व्हायचा असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत साठी घड्याळ या चिन्हाबाबत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत घड्याळ या चिन्हा बाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अथवा घड्याळ हे चिन्ह विधानसभा निवडणुकीपुरते गोठवून ठेवा, अशी मागणी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.