पाडळसे गावात वारंवार वीज पुरवठा खंडित, ग्रामस्थ बेजार, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष्य
फैजपूर, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील पाडळसे गावात गेल्या महिनाभरापासून वारंवार पुरवठा बंद होतो यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन गरजा पासून वंचित राहावे लागत आहे. पाडळसे गावाची लोकसंख्या ९००० च्या आसपास असून पाडळसे गावाच्या लगतच्या खेडेगावात पिठाच्या गिरण्या नसल्यामुळे पाडळसे गावातून नागरीक पीठ दळून नेतात व गावामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाडळसे गावासह परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
काल दिनांक २६ रोजी रात्री साडेआठ वाजेपासून वीजपुरवठा खंडित झाला तो दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पूर्ववत झाला. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाडळसे गावातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे . खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबद्दल गावातील ग्रामस्थांना कोणताही सक्षम अधिकारी माहिती देत नाही. शाळा , महाविद्यालयाची शैक्षणिक वर्षाची आता सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास देखील करता येत नाही. तसेच पाडळसे गावातील मुख्यालयात कोणताही सक्षम अधिकारी रहिवास करत नसल्याने ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन पाडळसे गावातील मुख्यालयात संबंधित लाईनमन व सक्षम अधिकारी यांना कायम रहिवासाची सक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.