भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

८ जानेवारी पासून बलवाड़ी येथे श्रीमद भागवत कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताह

बलवाड़ी, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील बलवाड़ी येथे ०८ जानेवारी श्रीमद भागवत कथा व हरिनाम संकीर्तन हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. श्री. ह. भ. प. समाधान महाराज रेंभोटेकर हे कथा वाचन करतील.

या सप्ताहात श्री. ह.भ. प. स्वप्निल महाराज गिरड़कर , श्री. ह.भ. प. गोपाल महाराज बढझीरीकर, श्री. ह. भ. प. समाधान महाराज भोजेकर, श्री. ह. भ. प. गोविंद महाराज वरसाडेकर, श्री. ह. भ. प.सूर्यभान महाराज शेळगावकर, श्री. ह. भ. प. शारंगधर महाराज मेहूणकर श्री. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधिकर यांची कीर्तन सेवा मिळेल. व श्री. ह. भ. प. अमोल महाराज होगे, श्री. ह. भ. प. भूषण महाराज दौड़, आळंदी, गायनाचार्य तसेच श्री. ह. भ. प. माधव महाराज आकोट, मृदंगाचार्य व श्री. ह.भ. प. गणेश मोरे सुसरी, श्री. ह. भ. प. राजेंद्र पाटील सुसरी विनेकरी ३० जानेवारीला श्री. ह.भ.प. समाधान महाराज रेंभोटेकर यांचे काल्याचे कीर्तन नंतर महाप्रसाद व रात्री भारूडांचा कार्यक्रम होईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!