१ ऑक्टोबर पासून “या” लोकांना आता रेशन मिळणे बंद, रेशन कार्ड ही रद्द केले जाणार
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भारत सरकार देशातील गरीब गरजू लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अत्यंत कमी दरात रेशन वर धान्य पुरवत होती. आता मोदी सरकार तेच धान्य रेशनवर कोट्यवधी लोकांना मोफत देत आहे.
मात्र सरकारच्या या मोफत रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांकडे शिधापत्रिका असणे खूप आवश्यक आहे. परंतु सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या बाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच जारी केली होती.आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदलेली आहेत. या सर्वांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत, सर्व शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. मात्र अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ज्या शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे रेशन १ ऑक्टोबर पासून बंद होणार आहे. ई – केवायसी करण्याचे शासनाने आदेश काढल्यानंतरही अनेक ग्राहक हा विषय गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. सरकारने ई-केवायसी करण्यासाठी ३१ सप्टेंबर ही शेवटची तारीख निश्चित केलेली आहे.
म्हणून जर ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिकाधारकाने ३१ सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. तर त्याला रेशन मिळणार नाही. व ई- केवायसी न केलेल्या शिधापत्रिकाधारकांची नावे ही शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत. तसेच ई-केवायसी नसलेली शिधापत्रिका रद्द केली जातील. व या लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही.
स्वस्त धान्य दुकानात हैं- केवायसी प्रक्रिया निःशुल्क आहे. स्वस्त धान्य दुकानातील पौस मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील सदस्यांची केवायसी करून घ्यावी. केवळ आधार कार्ड क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण न करणारे लाभार्थ्यांचे रेशन बंद होऊ शकते. ई-केवायसी करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून दुकानदारांना सुचना करण्यात आलेली आहे. त्यानुसार दुकानदार आपल्या कार्डधारकांना याबाबतच्या सुचना देखील करीत आहेत. कार्डधारकांना केवायसी अपडेट करावे लागणार आहे