भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

मिठाईला बुरशी, बुरशी जन्य मिठाईची सर्रास विक्री

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर राज्यात सर्वत्र मिठाईची विक्री केली जात आहे. ग्राहक मोठ्या प्रमाणावर मिठाईची खरेदी करीत असतात. त्यातच दुकानातून बुरशीजन्य मिठाई विक्री केली जात असल्याचा प्रकार पालघर मध्ये उघडकीस आला.

पालघर मधील हुतात्मा चौकात असलेल्या स्वीट स्मार्ट मधील अनेक मिठाईला बुरशी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या दुकानातून परिसरातील अनेक कारखानदारांनी व ग्रामपंचायतींनी, नागरिकांनी व मोठे व्यापारी अशा अनेक लोकांनी मिठाई खरेदी केली मात्र या मिठाईला बुरशी लागली असल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त करत दुकानदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, मिठाई खरेदी करताना खात्रीलायक दुकानातून पाहून मिठाई खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!