वाढ दिवसाच्या पार्टीत गुंगीच औषध देवून तरुणीवर सामूहिक बलात्कार
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l सामूहिक बलात्काराची पुन्हा एक धक्कादायक घटना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले. या धक्कादायक घटनेनंतर पुन्हा एकदा बदलापूरमध्येच सामूहिक बलात्काराची मोठी घटना समोर आली. बदलापूरमध्ये आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणी ला मैत्रिणीने गुंगिच औषध देवून मैत्रिणीच्याच परिचित शिवम राजे व संतोष रूपवते या दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एका २२ वर्षीय बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या तरुणीची गेल्या काही दिवसांपूर्वी शिरगाव परिसरात राहणाऱ्या भूमिका नामक तरुणीसोबत ओळख झाली होती. यास नवीन ओळख झालेल्या भूमिका नामक तरुणीने पिडीत तरुणीला दोन दिवसांपूर्वी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या, शिवम राजे वय २२ वर्ष. आणि संतोष रुपवते वय ४० वर्ष या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं. रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर तरुणीने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकलं. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पीडितेवर तरुणीच्या घरी मित्रांनी बलात्कार केला.
आपली मुलगी घरी परत न आल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या पालकांनी भूमिका नामक तरुणीशी संपर्क केला असता तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचे तिने सांगितलं. पीडित तरुणीला तिच्या पालकांनी घरी आणले असता पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं.
याबाबत पिडीत तरुणीने तिच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी पिडीत तरुणीची वैद्यकीय चाचणी केली असता यात तरुणीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र हा बलात्कार एका मित्राने केला, की दोघांनी? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण साताऱ्याहून आलेला शिवम राजे, वय २२ वर्ष. व संतोष रुपवते. वय ४० वर्ष. या तिघां विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.