भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

ब्रेकिंग : गॅस सिलिंडरच्या दरात कपात, “या” लोकांना मिळणार दिलासा

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l केंद्र सरकारने मोठं गिफ्ट देत तेल विपणन कंपन्यांनी पहाटे ६ वाजता गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार, एलपीजी व्यावसायिक सिलिंडर जवळपास ३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज पहाटेपासूनच नवीन दर लागू करण्यात आले आहेत. दर कमी केल्याने व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.

१९ किलो वजनाचा व्यावसायिक सिलिंडर जवळपास ३० ते ३१ रुपयांनी स्वस्त झाला. त्यामुळे आता मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५९८ रुपये इतकी झाली आहे.तर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर आता १६४६ रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये आजपासून व्यावसायिक सिलिंडर १८४०.५० रुपयांऐवजी १८०९.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३१ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर १७५६ रुपये इतके झाले आहेत. विशेष बाब म्हणजे, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग चौथ्या महिन्यात घट झाली आहे. या कालावधीत चारही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल १५० रुपयांनी स्वस्त झाला आहे.

दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीत. ९ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सर्वात कमी ८०२.५० रुपये इतकी आहे. तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारने गेल्या १० महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत जवळपास ३०० रुपयांनी कपात केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!