गॅस सिलेंडरचे दर घसरले, काय आहेत नवीन दर?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | देशभरातील गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ अथवा कमी झालेली नसून मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झाली असून व्यावसायिक प्रति गॅस सिलेंडरच्या किमतीत ८० रुपयांपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे.
८ एप्रिल रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तर आता व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत बदल झाल्यानंतर दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर १७२३.५० रुपयांना मिळणार आहे.
तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल आणि ढाबा चालकांना दिलासा मिळणार आहे. या दर कपातीनंतर हॉटेल मधील जेवण स्वस्त होणार का? याकडे खवय्यांचे लक्ष लागले आहे.