भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

Video। गाते प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मोजतेय शेवटच्या घटका: ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात !

Monday To Monday NewsNetwork।

सावदा, विशेष प्रतिनिधी: येथून जवळच असलेल्या सावदा रेल्वे स्टेशन जवळील गाते, ता.रावेर येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्र जीर्णावस्थेत झाले असून शेवटच्या घटका मोजत आहे. तसेच गाते गावातील गटारी कचऱ्याने व घाणीने तुडुंब भरलेल्या असून या कडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य घोक्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शिंदे व सहकाऱ्यांनी सांगितले.

या बाबत अधिक माहिती अशी की, गाते.ता.रावेर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पूर्णपणे मोळकीस आलेले असून ते नेहमी बंद असते,पुढून त्याला कुलूप असून केंद्राच्या मागील बाजूस पूर्णपणे खुले आहे आतमध्ये मोठी घाण साचलेली असून येथे एकही कर्मचारी येत नसून बाहेरच गावात कुठेतरी उपचार करीत असल्याचे संगितले ,या भग्नावस्थेतील उप केंद्राबाबत अधिकारी,पदाधिकारी याना कित्येक वेळा सांगूनही या कडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप लक्ष्मण शिंदे यांनी केला.

तसेच कोरोना सारखा भयानक महामारीच्या काळ असताना गाते या गावातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे येथील गटारी या कचऱ्याने पूर्णपणे तुडुंब भारल्या असून येथे मोठी दुर्गंधी पसरली असून परिसरातील घरात सर्द।वा झालेला आहे या मुळे ग्रामपंचायती बाबत लक्ष्मण शिंदे व सहकाऱ्यांनी मंडे टू मंडे प्रतिनिधींशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासन आता तरी जागे होईल का ? असा
प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!