आज बारावीचा निकाल, कुठे पाहता येणार निकाल?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील बारावीचा निकाल आज ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत अधिकृत माहिती दिली. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ६ मे पासून त्यांच्या महाविद्यालयांमधून गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र बोर्डाने फेब्रुवारी ते मार्च २०२५ या कालावधीत दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. आता परीक्षेच्या निकालासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार, राज्याचा बारावीचा निकाल उद्या ५ मे रोजी दुपारी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर आपली गुणपत्रिका ऑनलाईन पाहू आणि डाऊनलोड करू शकतील.
या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल
१. mahresult.nic.in
२. www.mahahsscboard.in
तसेच मंडळाच्या वेबसाईटशिवाय या ठिकाणी पाहता येणार आहे निकाल
३. http://hscresult.mkcl.org
४. https://results.digilocker.gov.in
५. http://results.targetpublications.org