स्वच्छ, सुंदर बोदवड शहराच्या निर्माणासाठी सेवेची संधी द्या – ॲड. रोहिणी खडसे
बोदवड, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांनी बोदवड शहरातील विविध प्रभागात आठवडे बाजार भागात रविंद्र भैय्यासाहेब पाटिल , उदय सिंह पाटिल यांच्या उपस्थितीत जन आशिर्वाद पदयात्रा काढून नागरिक, व्यापारी, महिला तरुणांशी संवाद साधला आणि शहराचा सर्वांगिण विकास घडवुन आणण्यासाठी आपल्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबुन मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती केली.
यावेळी नागरिक व्यापारी सर्व स्तरातून रोहिणी खडसे यांना उस्फुर्त प्रतिसाद लाभला शहराच्या विकासासाठी आम्ही सोबत असल्याचा नागरिकांनी रोहिणी खडसे यांना विश्र्वास दिला. यावेळी नागरिकां सोबत संवाद साधताना ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातुन शहरात अनेक विकास कामे झालीत त्यांनी शहरवासीयांना जो शब्द दिला तो पाळला याउलट मागिल निवडणुकीत विविध आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी पाच वर्षात आश्वासनांची पूर्ती केली नाही.
आ एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्यासाहेब पाटिल आणि जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असलेल्या या निवडणुकीत
आपण मतदानरूपी आशिर्वाद देऊन सेवेची संधी दिल्यास शहरातील रखडलेल्या विकास कामांचे निराकरण करून पाणी पुरवठा योजना, रस्ते, व इतर समस्या मार्गी लावुन शहराचा विकास आराखडा तयार करुन मूलभूत सुविधांचे निर्माण करून शहराचा सर्वांगिण विकास घडवुन नियोजनबध्द स्वच्छ सुंदर शहराचे निर्माण करण्याची रोहिणी खडसे यांनी मतदारांना ग्वाही दिली.
यावेळी माजी सरपंच कैलास माळी म्हणाले नाथाभाऊ यांच्या प्रयत्नाने बोदवड ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतरण झाले त्यामुळे शहर विकासाला नगरविकास खात्या मार्फत निधी मिळणे सोपे झाले. नाथाभाऊंच्या माध्यमातून शहरात अनेक विकास कामे झालीत शहराला पाणी पुरवठा करणारी ओडीए योजना झाली याउलट विद्यमान आमदारांनी गेले पाच वर्ष पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली नुसता वेळखाऊपणा केला.योजनेसाठी नुसत्या बैठकाच घेतल्या कधी ओझरखेडा धरणावरून योजना मंजुर झाल्याचे सांगितले तर कधी तापी नदी वरून मंजुर झाल्याचे सांगितले परंतु पाच वर्षांत कोणतीच योजना अस्तित्वात आली नाही एकीकडे पाणी पुरवठा मंत्र्यांच्या जवळचे असल्याचे सांगतात परंतु पाच वर्षात दिलेले आश्वासन पुर्ण करु शकले नाहीत पाच वर्ष संपल्यावर पाणी पुरवठा योजना मंजुर झाल्याचे सांगत आहेत खरे खोटे देव जाणे म्हणुन आता शहराच्या, मतदासंघांच्या विकासाला गती देण्यासाठी रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे कैलास माळी यांनी नागरिकांना आवाहन केले.
यावेळी माजी सरपंच कैलास चौधरी यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले आ. एकनाथराव खडसे यांनी तिस वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकासाला प्राधान्य दिले तिस वर्षात कुठेही सामाजिक तेढ निर्माण झाली नाही, कुठेही खंडणी, दादागिरी गुंडगिरीचे प्रकार घडले नाहीत परंतु गेले पाच वर्षात काही लोकांनी मतदासंघांचे वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना आपल्याला मतदानातून उत्तर द्यायचे असुन मतदारसंघातील शांतता, जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी नाथाभाऊ यांचा विकासाचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या उच्चशिक्षित ॲड रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे माजी सरपंच कैलास चौधरी यांनी नागरीकांना आवाहन केले. आ एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्यासाहेब पाटिल आणि जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शाखाली रोहिणी खडसे या शहराचा, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करतील अशी कैलास चौधरी यांनी नागरीकांना ग्वाही दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरपंचायत गटनेते जाफर शेख यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले की आ एकनाथराव खडसे यांनी नेहमी शहराच्या विकासासाठी पुढाकार घेतला त्यांनी शहराच्या विकासासाठी वेळोवेळी निधी मंजुर करून आणला परंतु विद्यमान आमदारांनी या निधीला तांत्रिक कारणे देत सत्तेचा दुरुपयोग करत या निधीला स्थगिती आणली किंवा निधी इतरत्र वळवला यात प्रामुख्याने तेली समाज मंगल कार्यालय, मुस्लिम शादिखाना व विविध प्रभागातील वेगवेगळ्या विकास कामांसाठी मिळालेल्या निधीचा समावेश आहे
म्हणून आता विकास कामांना स्थगिती देणाऱ्यांना कायमची स्थगिती देण्याची वेळ आली असुन शहराच्या विकासासाठी
रोहिणी खडसे यांना मतदान करण्याचे गटनेते जाफर शेख यांनी आवाहन केले
यावेळी रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांनी मागिल निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या आदेशाने आपण विद्यमान लोकप्रतिनिधी यांना मतदान केले परंतु त्यांनी गेले पाच वर्षात मतदारांचा भ्रमनिरास केला कोणत्याच आश्वासन पुर्ण केले नाही म्हणून आता मागिल चुक सुधारून जनसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा