“चार मुले जन्माला घाला, आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा…. ” कोणी दिली ही ऑफर ..
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l चार मुलांना जन्म घालणाऱ्या जोडफ्याना १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अशी घोषणा इंदूरमधील परशुराम कल्याण मंडळाने ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ” चार मुले जन्माला घाला, आणि एक लाख रुपये मिळवा ” अशी घोषणाच त्यांनी केली आहे.
त्यांच्या या ऑफरची मात्र सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमधील परशुराम कल्याण मंडळाचे अध्यक्ष विष्णू राजोरिया यांनी ब्राह्मण जोडप्यांसाठी एक घोषणा केली आहे. चार मुले जन्माला घालणाऱ्या जोडप्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. विष्णू राजोरिया यांचे ही घोषणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यांनी असेही म्हटले आहे की, ब्राह्मणांनी कमी मुले निर्माण केली तर बिगर हिंदू देश ताब्यात घेतील. असेही ते म्हणाले आहेत. हे विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या या भूमिकेवर लोकांच्या संमिश्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक लोक या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर अनेक जण त्यावर टीकाही करत आहेत. त्यांनी लोकसंख्या वाढवण्या बद्दल पुरस्कार जाहीर केला आहे. व विनंतीही केली आहे.
विष्णू राजोरिया यांनी, तरुण ब्राह्मण जोडप्याने जर चार मुले जन्माला घातल्यास या जोडप्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भोपाळमध्ये आयोजित एका सामाजिक कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. या कार्यक्रमाला संबोधित करताना राजोरिया म्हणाले की, ‘पाखंडी लोकांची संख्या वाढत आहे. कारण आम्ही आमच्या कुटुंबाकडे लक्ष देणे मोठ्या प्रमाणात बंद केले आहे. मला तरुणांकडून खूप अपेक्षा आहेत. भावी पिढ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे. तरुण स्थिरावतात आणि एका मुलानंतर थांबतात. मी तुम्हाला किमान चार मुले जन्माला घालण्याची विनंती करतो. असेही विष्णू राजोरिया म्हणाले.
पुढे बोलताना राजोरिया म्हणाले की, ‘मुले होण्यात मागे राहू नका’ब शिक्षण आता महाग झाले आहे. कसा तरी उदरनिर्वाह करा, पण मूल होण्यात मागे राहू नका. नाहीतर पाखंडी लोक या देशाचा ताबा घेतील. राजोरिया पुढे म्हणाले की, त्यांनी असेही स्पष्ट केले की, ही घोषणा हा सरकारी उपक्रम नसून वैयक्तिक उपक्रम होता. ते म्हणाले, ‘हे माझे सामाजिक विधान आहे, जे एका सामुदायिक कार्यक्रमात दिले आहे. ब्राह्मण समाजातील उच्च पदांसाठी मुलांचे शिक्षण आणि प्रशिक्षण या वचनबद्धतेची पूर्तता करू शकते, असेही ते म्हणाले