मला एकदा संधी द्या मी विकास करून दाखवीन : अमोल जावळे
रावेर शहरातील रैलीला प्रचंड प्रतिसाद
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारात मला जनतेचा उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून मतदारांनी मला एकदा संधी द्यावी मी मतदार संघाचा विकास करून या संधीचे सोनं करून दाखवेल असे आश्वासन महायुतीचे रावेर मतदार संघाचे उमेदवार अमोल जावळे यांनी दिले. त्यांनी आज रावेर पाल या भागात प्रचार दौरा केला.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल जावळे यांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि गाव पिंजून काढले. भाजपचे संघटन हे अत्यंत मजबूत असून कार्यकर्त्यांनी अमोल जावळे यांच्यासाठी जिवाचे रान केले. मतदार संघात भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,केंद्रीय मंत्री सी.आर पाटील, चित्र वाघ आदी.नेत्यांच्या सभा पार पडल्या त्यामुळे वातावरण निर्मिती झाली. आणि भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. नेत्यांच्या प्रचार सभा, रोडशो कॉर्नर सभा आणि विशेषतः घराघरात जाऊन कार्यकर्त्यांनी अमोल जावळे यांचा प्रचार केला आहे.
हिंदुत्व आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यातही महायुतीचे सरकार असले पाहिजे अशी एकूणच मतदारांची भूमिका असल्याने अमोल जावळे यांचा विजय सोपा होऊ शकतो असा अंदाज आहे. गेल्या वेळी स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या पराभव झाल्याचे शल्य कार्यकर्त्यांना असून यावेळी विजय खेचून आणून अमोल जावळे यांच्या रूपाने महायुतीचा आमदार विधानसभेत पोहोचावा यासाठी भाजप सह महायुतीतील घटक पक्ष आणि संघ कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध प्रचार केला आहे. अमोल हरिभाऊ जावळ हे प्रचारामध्ये गुंतल्याने त्यांच्या प्रचाराची रणनीती मंत्री गिरीश महाजन यांनी खांद्यावर घेतली आहे. स्थानिक कार्यकर्ते यांनी प्रचारात झोकून काम केले आहे. स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांची उणीव भरून काढण्यासाठी अमोल जावळे यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवावे यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहे.
या प्रसंगी सुरेश धनके, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, गोपाळ नेमाडे, हरलाल कोळी, अहमद तडवी, जितू पाटील, मिलिंद वायकोळे,महेश पाटील , चेतन पाटील, विजय महाजन, वासुदेव नरवाडे, आशाताई सपकाळे, वासुदेव नरवाडे, सुरेश पवार, जितू पवार, धनसिंग पवार यांच्यासह महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांनी या दौऱ्यात जावळेंना भक्कम विजयाची खात्री दिली.