फैजपूर मधील “ते” भरवस्तीतील फटाक्यांचे गोडाऊन अवैधच, नगरपालिका अधिकाऱ्यांचा खुलासा, मग कारवाई का करीत नाही?
भानुदास भारंबे.
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l फैजपूर शहरात भरवस्तीत फटाक्यांचे गोडाऊन असल्याचे वृत्त “मंडे टु मंडे न्युज” ने दिले. या वृत्ताने फैजपूर शहरात सर्वत्र खळबळ उडाली. या फटाक्यांच्या गोडाऊन मुळे भरवस्तीत असल्याने परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण फैजपूर शहरतील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात या फटाक्यांच्या गोडाऊन ला कुठलीच परवानगी नाही. बऱ्याच वर्षांपासून हे गोडाऊन या ठिकाणी आहे. एव्हढा गंभीर प्रकार असताना प्रशासनासह सर्वच झोपेचे सोंग घेत आहेत. खालून वर पर्यंत माझे संबंध आहे, असे संबंधित गोडाऊन मालक सांगत असतो.
या संदर्भात फैजपूर नगरपालिकेचे ओ एस कुटे. याना विचारले असता सुरुवातीला परवानगी दिली आहे की नाही या बद्दल माहिती नसल्याचे सांगितले. म्हणजे एका पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्याला या संदर्भात माहिती नाही. हे आच्चर्यच म्हणावे लागेल. त्या नंतर त्यांनी चौकशी करून सांगतो असे सांगितले, चौकशी अंती या भरवस्तीतील फटाक्यांच्या गोडाऊनला कुठलीही परवानगी नसल्याचे o s कुटे यांनी “मंडे टु मंडे न्युज” शी बोलताना सांगितले. तसेच कारवाई साठी कर्मचारी पाठविल्याचे ही सांगितले. मात्र त्या नंतर कारवाई काय केली,किंवा केली की नाही. या बद्दल त्यांनी कुठलीही माहिती दिली नाही. फोन रिसिव्ह केला नाही. जर त्या भरवस्तीतील फटाक्यांच्या गोडाऊनला कुठलीही परवानगी नाही तर अधिकारी कारवाई का करीत नाही? काही आर्थिक हितसंबंध तर नाही ना? इतकी वर्षे भरवस्तीत हे फटाक्यांचे गोडाऊन कुठलीही परवानगी नसताना कायम आहे. ‘घोड कुठं दान खातंय ‘
फैजपूर नगरपालिका संबंधित अधिकाऱ्यांचा हा बेजबाबदार पणा म्हणावा, की जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत? आता पर्यंत या गोडाऊन वर कारवाई का केली नाही?
या संदर्भात अधिक चौकशी केली असता संबंधित अधिकारी, कर्मचारी व इतरांना पोहोच आर्थिक मलिदा दिला जात असतो. हजारो नागरिकांचा जीव धोक्यात टाकून हे भ्रष्ट अधिकारी चिरी मिरी साठी हे प्रकार करीत आहेत. या सर्व प्रकारची चौकशी होऊन गोडाऊन सह संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जातं असून या संदर्भात वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करण्यात येणार आहे. क्रमशः