ऐन दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदीच्या भावात घसरण: दागिने खरेदीला सुवर्णसंधी
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | सध्या सोने आणि चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळत असून नवरात्र आणि पितृ पंधरवड्यात वधारलेले सोने आणि चांदीचे दर घसरत असल्याने नागरिकांना एन दिवाळीत दागिने खरेदीला सुवर्णसंधी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
५ नोव्हेम्बरपासून सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत असून सोने प्रति १० ग्राम ला आज ९ रोजी ६० हजार ३० रुपये इतका दर आज दुपारी १२ वाजेपर्यंत होता. तर चांदी प्रति किलो ७० हजार ५४० रुपये इतका दर मिळाले असून सोने प्रति १० ग्रामला ८० रुपये कालच्या तुलनेत कमी मिळाला .
तर चांदीच्या भावात कालच्या तुलनेत आज दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ५४० रुपयांची घट पाहायला मिळाली . त्यामुळे सोने आणि चांदीचे भाव घसरल्याने सोने चांदी खरेदीला ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी होत असून दिवाळीनिमित्त दागिने, शिक्के,मूर्ती व सोने चिप आदी खरेदीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
सलग चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात सोने आणि चांदीच्या किमतीत मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर घसरण दिसून आली. दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदीत स्वस्ताई आल्याने ग्राहकांना हायसे वाटले आहे. त्यांची पावलं पुन्हा सराफा बाजाराकडे वळली आहे. धनत्रोयदशीपर्यंत घसरण कायम राहिल्यास सराफा पेठेत गर्दी उसळेल.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात सोन्या-चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेतली होती. गेल्या महिन्यात सोन्याच्या किमतीत 3,651 रुपयांची वाढ झाली होती. ऑक्टोबरच्या सुरुवातीला म्हणजेच 1 ऑक्टोबरला ते 57,719 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे 31 ऑक्टोबरला 61,370 रुपयांवर पोहोचले. मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमतीत चढ उतार दिसून आला.