महाराष्ट्रसामाजिक

ऐन लगीनसराईत सोन्याचा भाव ऐतिहासिक, ग्राहक चिंतेत

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सध्या सगळीकडे लग्नसराई पाहायला मिळत आहे.लग्नकार्य असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम सोन्याचे दागिने अतिशय महत्त्वाचे आहेत.
सोन्या-चांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसापासून चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं समोर आलं आहे. चांदीच्या किंमतीतही वाढल्या आहेत. लग्नसराईचा हंगाम सुरु झाला असून आज ६ फेब्रुवारी २०२५ ला गुरुवारी सोन्याचे दर वाढले आहेत. तर चांदीचीही दरवाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमची किंमत ८६५१०  रुपये झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅमचे दर ७९२१० रुपये झाले आहेत. तसंच आज चांदीचे दर प्रति किलोग्रॅम ९९६०० रुपये झाले आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याच्या भावात मोठी वाढ होत असल्याने ग्राहकांची मात्र चीता वाढली आहे.

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर  (प्रति १० ग्रॅम)
मुंबई. ८६,५१०
पुणे   ८६,५१० रुपये
नागपूर ८६,५१०
कोल्हापूर. ८६,५१० रुपये
जळगाव. ८६,५१०
ठाणे   ८६,५१०

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!