महाराष्ट्र

दिवाळी पूर्वीच आनंदाची बातमी, पेट्रोल – डिझेल चे दर “इतक्या” रुपयांनी कमी होणार

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती पुन्हा एकदा उच्चांक पातळीवर पोहोचल्या आहेत. ७१ डॉलर बॅरलच्या आसपास किंमत आहे. त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलवर झाला आहे. सणासुदीच्या काळात पेट्रोल डिझेल वाढण्याची शक्यता असताना मात्र मोदी सरकारने खुशखबर दिली आहे. दिवाळीपूर्वीच सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. तेलाच्या किमती ५ रुपयांनी कमी होतील, असे सरकारने म्हटले आहे. ही कपात पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरात होणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही घोषणा केली.

पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून या निर्णयाची माहिती दिली. तेल कंपन्यांनी पेट्रोल पंप डीलर्सचे कमिशन ७ वर्षांनंतर वाढवले ​आहे. असे असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याऐवजी अंदाजे ५ रुपयांनी कमी होणार आहेत. रिफायनरी रेल्वे आणि रस्त्याने जोडल्या जातील, ज्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तेलाचा पुरवठा करणं सोपं होईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!