भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

आनंदाची बातमी,लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता महिलांमध्ये होती.

डिसेंबर महिन्याच्या सहावा हप्ता आजपासून पात्र महिलेच्या बँक खात्यात जमा करण्याची सुरुवात महिला व बाल विकास मंत्रालयाकडून झाली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील अधिवेशन समाप्त झाल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी वर्ग करण्याचे वचन दिले होते. त्यानुसार, या वर्षीच डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे आणि यामध्ये प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला 1500 रुपयांची रक्कम दिली जाईल.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीचे पाच हप्ते पात्र लाभार्थींच्या खात्यात यापूर्वीच वर्ग करण्यात आले आहेत. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत 1500 रुपयांच्या हप्त्यांप्रमाणे एकूण 7500 रुपये वर्ग करण्यात आले होते. निवडणुकांपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला होता. आता डिसेंबरसाठीची रक्कमही आजपासून खात्यात वर्ग केली जात आहे.

लाडकी बहीण योजनेत 1500 रुपयांच्या हप्ता 2100 रुपये अशी घोषणा महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान केली होती, आता लाडकी बहिणीच्या 2100 रुपयाच्या हप्ता कधी मिळणार याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळाला सांगितले की राज्याच्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर वाढीव लाडकी बहीण योजनेच्या हप्ता महिलांना देण्यात येणार आहे, आता हा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होईल अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना आता 2100 रुपयाच्या हप्ता साठी मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!