भुसावळ – सुरत रेल्वे रुळावर मालगाडी घसरली, वाहतूक ठप्प
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ – सुरत रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळावर भुसावळ कडून नंदुरबार कडे जाणारी मालगाडी १५ मे गुरूवार रोजी दुपारी २ बाजेच्या सुमारास अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाजवळ रुळावरून घसरल्याची दुर्घटना घडली. यात कोणालाही शारीरिक दुखापत झालेली नसल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेली माहिती अशी की, आज गुरूवार दिनांक १५ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भुसावळ कडून नंदुरबार कडे भुसावळ सुरत मार्गे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर मालगाडी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाजवळ अमळनेर रेल्वे स्थानका पासून जवळच रुळावरून घसरल्याची घटना घडली.
मालगाडीचे काही डब्बे रुळावरून खाली उतरल्याने आजूबाजूचे रेल्वे ट्रॅकही खराब झाले आहेत. यामुळे सुरत- भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे. या मुळे रेल्वे प्रवाशाना त्रास सहन करावा लागत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाले नाही.
मालगाडी नेमकी कोणत्या कारणामुळे रुळावरून घसरली, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही. मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावरच रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.