क्राईमपाचोरा

अवैध गुटख्यासह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

पाचोरा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. या गुटखा तस्करांवर एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाचोरा शहरात गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाने २२ लाख रुपयांचा अवैध गुटखा आणि ८ लाख रुपये किमतीचे वाहन असा ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्या सोबत वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरखेडी नाका येथे गस्त घालणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश भदाणे, पो. हे. कॉ. राहुल शिंपी आणि वाहन चालक पो. कॉ. समीर पाटील यांच्या पथकाने भडगावकडून येणारे वाहन (क्रमांक MH-52-0034) थांबवले.

वाहनात असलेल्या समानाबद्दल  विचारणा केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने वाहनाची झडती घेतली असता महाराष्ट्रात बंदी असलेला व मानवी शरीरास अपायकारक असलेला गुटखा मोठ्या प्रमाणावर आढळला. पथकाने गुटख्यासह संबंधित वाहन जप्त करत वाहन चालकाला अटक केली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!