गोवंश कुर्बानीसाठी 6 बैलांची अवैध वाहतूक करणारे वाहन यावल पोलिसांनी जप्त केले; यावल, रावेर, चोपडा तालुका गोवंश तस्करांचे मोठे केंद्र; चौकशी झाल्यास गुरंढोरं चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येणार ?
सुरेश पाटील
यावल (प्रतिनिधी)। गोवंश जातीचे 6 बैल दाटीवाटीने बैलाचे जीवास इजा होईल असे कोंबुन तसेच गोवंश हत्या करण्यासाठी विनापरवाना अवैध वाहतूक करीत असलेले महिंद्रा पिकप वाहन आज दिनांक 28 जुलै 2020 रोजी सकाळी 4:45 वाजेच्या सुमारास यावल पोलीस स्टेशन पासून एक किलोमीटर अंतराच्या आत सकाळी डॉक्टर जाकिर हुसेन विद्यालया जवळील हडकाई नदीच्या पुलावर यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्वतः व त्यांच्यासोबत असलेले गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी सुशील घुगे, शामकांत धनगर, वारूळकर, होमगार्ड यांनी पकडून यावल पोस्टेला गुन्हा दाखल केला 2 आरोपीसह 2 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल यावल पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून यावल, रावेर, चोपडा तालुका हे गोवंश तस्कराचे मोठे केंद्र असल्याचे तसेच यावल, रावेर, चोपडा तालुक्यातून नेहमी चोरीच्या ज्या घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत त्या घटनांची चौकशी केल्यास गुरं-ढोरं चोरीचे फार मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पो.कॉ. सुशिला रामदास घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आज दिनांक 28 जुलै 2020 मंगळवार रोजी सकाळी 4:45 वाजेच्या सुमारास डॉक्टर जाकिर हुसेन हायस्कूल जवळ हडकाई नदीचे पुलावर सार्वजनिक जागेवर आरोपी दगडू आनंदा साळुंके वय 40 रा. ठाणेदरवाजा, सिद्धार्थ नगर चोपडा. त्यासोबत असीम इसाक शेख वय 21 रा. मिल्लतनगर चोपडा. जावेद्दीन काझी वय 42 मोमनअली रा. चोपडा.यांनी संगनमत करून विनापरवाना, बेकायदा कोणत्याही प्रकारची खरेदी विक्री पावती तसेच वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय गोवंश जातीचे 6 बैल दाटीवाटीने बैलाचे जीवास इजा होईल असे कोंबून भरून त्यापैकी एक पांढरा रंगाचा बैल जखमी त्याची एकूण अंदाजे किंमत 81 हजार रुपये हे हत्या करणे कामी महिंद्रा पिकअप वाहन क्र.MH–19–BM–3357 या वाहनांची अंदाजे किंमत 2 लाख रुपये असलेल्या वाहनात बेकायदेशीर रीत्या गुपचूप भरून गोवंश हत्या करणे करीता वाहतूक तस्करी केली म्हणून वरील 3 ही आरोपी विरोधात हत्तेकरिता बेकायदेशीर, विनापरवाना गोवंश खरेदी विक्री केली व तस्करी केली म्हणून यावल पो.स्टे.ला भाग-५ गु.र.क्र. १२७/२० कलम ४४९ भा.दं.वि. सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ अ, ६,९ सह महाराष्ट्र पशु क्रुरता अधिनियम ११(१), सह मु.पो.का. ११९ सह मो.व्हे.का.क. १३०(१) १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या आदेशान्वये पुढील चौकशी आणि कार्यवाही पी.एस.आय. सुनिता कोळपकर करीत आहेत. यावल तालुक्यासह रावेर चोपडा तालुक्यात ठिक– ठिकाणी अनेक गुरंढोरं कत्तल खान्यानाना अधिकृत परवानगी नसताना अवैध अनधिकृत कत्तलखाने सुरू असून मोठ्या प्रमाणात मांस वाहतूक करण्यात येत असते याकडे नगरपालिका प्रशासन, ग्रामपंचायत विभाग, पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून ओळख असणारे पोलीस पाटील आणि वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याने यावल, रावेर, चोपडा तालुक्यात संयुक्तिक मोहीम राबविल्यास गुराढोरांचे चोरीच्या घटनांना आणि गोवंश हत्तेला मोठा आळा बसेल असे सर्व स्तराततून बोलले जात आहे.