आंतराष्ट्रीय

चिनी शास्त्रज्ञांना मोठे यश : चंद्रावरील मातीतून काढले पाणी

बीजिंग, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l चंद्रावर पाण्याचा नवीन स्त्रोत सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. १ टन मातीतून ७० लिटर पाणी काढल्याचा दावा चिनी संशोधकांनी केला आहे. उल्कापाताचा आघात होणाऱ्या ठिकाणी शास्त्रज्ञांना पाण्याचे अंश सापडल्याचा दावा चीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. चंद्रावर पाण्याचा नवीन स्त्रोत सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. चीनने २०२० मध्ये केलेल्या चांद्र मोहिमेतील नमुन्यात हे पाण्याचे अंश मिळाल्याचेही यावेळी या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

चंद्रावर सापडलेले हे पाण्याचे अंश केसाच्या आकाराइतके असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. याबाबतची माहिती नानजिंग विद्यापीठातील संशोधक हेज्यू हुई यांनी दिली आहे. चंद्रावर सापडलेल्या पाण्याचे प्रमाण हा त्यातील एक छोटासा अंश असल्याचे हेज्यू हुई यांनी स्पष्ट केले. या इम्पॅक्ट बीड्सपैकी काहीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण असू शकत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्याचे उत्खनन करणे कठीण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.अर्थात पाण्याचे संशोधन करणे कठीण असल्याचे सांगितले.

चंद्रावरील मती हायड्रोजन समृध्द असल्याचा दावा ही करण्यात आला आहे.चंद्रावर पाण्याच्या अंशाचे अनेक मणी असल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. मात्र यावर संशोधनासाठी भरपूर पाण्याचे मणी लागणार असल्याची माहितीही हुई यांनी दिली आहे. सौर वाऱ्यामध्ये हायड्रोजनच्या सततच्या भडिमारामुळे या मण्यांमधून सतत पाणी येऊ शकते, असेही या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. याबाबतचे संशोधन नेचर जिओसायन्स या जर्नलमध्ये सोमवारी प्रकाशित झाले. त्यामध्ये याबाबतचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. या चांद्रमोहिमेतून परत आलेल्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या पृष्ठभागावरुन निवडलेले ३२ मणी आणले आहेत. या नमुन्यांचा अभ्यास करण्यात येईल, असेही हुई यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

अशा प्रकारचे चंद्रावर  पाण्याचे अंश असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. अंतराळ खडकांद्वारे बाहेर काढलेल्या वितळलेल्या पदार्थाच्या थंड होण्याच्या परिणामामुळे पाण्याचे अंश गोठल्याचा दावाही शास्त्रज्ञांनी केला आहे. भविष्यातील रोबोटिक मोहिमेद्वारे हे मणी गरम करून पाणी काढले जाऊ शकते. मात्र चंद्रावरील पाण्याच्या अंशाना वितळवणे व्यवहार्य आहे की नाही, हे ठरवण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही या संशोधकांनी यावेळी स्पष्ट केले. तसे केल्यास हे पाणी पिण्यास सुरक्षित आहे की नाही याबाबत संशोधन होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यासह चंद्रावर एक नवीन जलसाठा असल्याचे यावेळी हुई यांनी यावेळी सांगितले आहे.

काही दशकांपूर्व अपोलो मिशन अंतर्गत चंद्रावर गेलेल्या अमेरिकन अंतराळवीरांनी चंद्राच्या मातीचे नमुने आणले होते. यावरून शास्त्रज्ञांनी चंद्राची माती ही कोरडी असल्याचा निष्कर्ष काढला होता. याला नासाने सुद्धा पाठिंबा देत चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याची कमतरता असल्याचे सांगितले होते. मात्र आता तब्बल ४० वर्षांनी हा दावा फोल ठरून चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!