भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

मोठी बातमी : अरविंद केजरीवालांना दिलासा, ऐन लोकसभा निवडणुकीत तुरुंगाबाहेर येणार

दिल्ली,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एक मोठी बातमी राजधानी दिल्लीतून आहे. दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांनी दिलासा देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे .

सर्वोच्च न्यायालयाकडून १ जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. सध्या देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणुकांचे तीन टप्पे पार पडल्यानंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मोकळीक दिली आहे. दरम्यान, २५ मे रोजी दिल्लीत लोकसभेचं मतदान पार पडणार असून ६ जागांवर हे मतदान होणार आहे. अशातच अरविंद केजरीवाल यांना १ जून पर्यंत अंतरिम जामीन मिळाला असला तरी २ जून रोजी त्यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण करावं लागणार असल्याच सांगितलं गेलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!