भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

मोठी बातमी : पी. एम. किसान व नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ४ हजार रुपये

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l सध्या सणासुदीचे दिवस आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पी.एम. किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीतील अनुक्रमे १८ वा आणि पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते शनिवार ५ ऑक्टोबर, २०२४ ला सकाळी ११.०० वाजता वाशिम येथील समारंभात वितरीत करण्यात येणार आहे.

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. २०००/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. २०००/ असा एकुण रू. ४०००/ चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते राज्यातील सुमारे ९१.५२ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होतील.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६००० /- त्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे.

१८ जून २०२४ रोजी सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून जमा करण्यात आलेला होता. तसेच आता त्यानंतर ५ ऑक्टोबर २०२४ ला शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान योजनेच्या १८ व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.व त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजने अंतर्गत २ हजार रुपये सुद्धा जमा केले जाणार आहे त्यामुळे असे मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ४००० रुपये जमा होणार आहे. या मुळे शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!