भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी : पाच लाखांवर विद्यार्थी बोगस दाखवून संस्थाचालकांनी पदे करुन घेतली मंजूर,दरमहा होतेय शासनाची पाचशे कोटींची लूट

जळगाव जिल्ह्यासह रावेर – यावल तालुक्यातही

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील शिक्षण क्षेत्रातून एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.राज्यातील खासगी संस्थाचालकांनी वर्गात बोगस विद्यार्थी दाखवून शासनाची फसवणूक करून मोठी लूट चालवली आहे. राज्याभरात तब्बल पाच लाख विद्यार्थी बोगस आढलल्याचे समोर आले आहे.

संस्था चालकांनी आपल्या शाळांची पटसंख्या पूर्ण करण्यासाठी वर्ग कमी होऊ नये यासाठी बोगस विद्यार्थी दाखवून अनुदान लाटले जात आहे. राज्यात दरमहा बोगस विद्यार्थ्यांवर पाचशे कोटी रुपये खर्च केले जात असल्याची धक्कादायक माहिती उघळ झाली आहे .

संस्था चालकांनी विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसताना मुद्दामहून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला आहे. ही बोगस विद्यार्थी संख्या आधार कार्डमुळे समोर आली आहे. राज्यभरात बोगस विद्यार्थी शाळेत नोंदी केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. राज्यात एकूण ५ लाख १६ हजार १८८ विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश आधार कार्ड नसताना झाला आहे. हे विद्यार्थी बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश करताना आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे.त्या मुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इतकेच नव्हे तर एकेका विद्यार्थ्याचे नाव दोन – दोन शाळां मध्ये प्रवेश दाखून पटसंख्या दाखविण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यासह रावेर – यावल तालुक्यातही
जळगाव जिल्ह्यासह रावेर – यावल तालुक्यातील काही शाळांमध्ये बोगस विद्यार्थी शाळेत दाखवल्याने प्रकार समोर आले आहे, तसेच ऐका विद्यार्थ्याचा प्रवेश ऐका शाळेत असताना दुसऱ्या शाळेत बोगस प्रवेश दाखविल्याचे समोर आले आहे . या बाबत गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी चौकशीही झाली आहे. परंतु या बाबत कुठलीही अधिकृत माहिती सांगितली गेली नाही. या धक्कादायक प्रकारात संबंधित अधिकारी व बोगस विद्यार्थी दाखविलेले संस्थाचालक यांनी अर्थपूर्ण प्रकारातून ही प्रकरणे दाबली असल्याची मोठी चर्चा आहे.याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

धक्कादायक माहिती समोर
राज्यातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये ५ लाख विद्यार्थी बोगस आढळून आली असून आधार कार्ड नसलेले ५ लाखांवर विद्यार्थी दाखवून शाळांनी पदे मंजूर करुन घेतली. युडायस प्रणालीत दाखवलेली पटसंख्या त्या तुलेनेत नोंदविलेली आधार संख्या यावरून राज्य शिक्षण विभागाने आक्षेप नोंदवला आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ लाख २६ हजार ८७४ विद्यार्थी आहेत. परंतु त्यापैकी आधार नसलेले १ लाख ७९ हजार ५६ विद्यार्थी आहेत. म्हणजेच हे विद्यार्थी बोगस आहेत. खासगी अनुदानित शाळांमध्ये एकूण ९७ लाख ६९ हजार;२०२ विद्यार्थी आहेत. त्यापैकी आधार क्रमांक नसलेले १ लाख ११ हजार ४४४ विद्यार्थी आहेत. तसेच खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये ६२ लाख ६१ हजार ७७७ विद्यार्थी आहेत. त्यातील २ लाख २५ हजार विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. म्हणजे एकूण ५ लाख १६ हजार १८८ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. अर्थात हे विद्यार्थी बोगस आहेत.

राज्यातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसताना वाढीव पट दाखवला आहे. राज्यातील खासगी शाळांवर शिक्षण खात्याचा थेट आक्षेप आहे. यामुळे राज्य शासनाचे कोट्यवधी रुपये दर महिन्याला जात आहेत.

राज्यात सर्वात आधी २०२१ मध्ये बीड जिल्ह्यात बोगस पटसंख्या दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ‘जनहित याचिका’ दाखल झाली होती. त्यानंतर न्यायालयाने चौकशीसाठी न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास (निवृत्त) यांची समिती नेमली होती. या समितीने जुलै २०२२ मध्ये अहवाल शासनाला दिला. तो अहवाल शासनाने स्वीकारला आणि मार्गदर्शक सूचना आता काढल्या होत्या. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेताना आधारची सक्ती करण्यात आली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!