भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

मोठी बातमी : गांधी कुटुंब काँग्रेसला मतदान करणार नाहीत, काय आहे कारण?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रातील निवडणूकीचा टप्पा संपला असला, तरीही देशात मात्र अद्याप निवडणुकीचा माहोल कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सुरु असणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचं मतदान आज शनिवार, २५ मे २०२४ रोजी पार पडत असून, यामध्ये ७ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५८ जागांसाठी मतदान पार पडत आहे.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघाचा या टप्प्यामधघ्ये समावेश असून, या सहाव्या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या टप्प्यात धर्मेंद्र प्रधान, कृष्ण पाल सिंग गुर्जर आणि राव इंद्रजित सिंग हे तीन केंद्रीय मंत्री रिंगणात आहेत. तर तीन माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, मनोहर लाल खट्टर आणि जगदंबिका पाल हे देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यासोबतच मनोज तिवारी, कन्हैय्या कुमार, मनेका गांधी, बांसुरी स्वराज, संबित पात्रा, राज बब्बर, निरहुआ हे उमेदवारही रिंगणात आहेत.

दिल्लीतील सात जागांवर आज मतदान होत आहे. नवी दिल्ली मतदारसंघात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचंही मतदान आहे.परंतु गांधी कुटुंब आज होणारे मतदान काँग्रेसला म्हणजेच पंजाला मतदार करणार नाहीत. ते आम आदमी पक्षाच्या (AAP) झाडू या चिन्हाला मतदान करणार आहेत.

गांधी कुटुंबाचं मत आणि ‘आप’ या पक्षाला ..?
दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी झाली आहे. त्यात नवी दिल्लीचा लोकसभा मतदारसंघ हा आम आदमी पक्षाला मिळाला असून, याच नवी दिल्ली मतदारसंघात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचंही मतदान आहे. नवी दिल्लीतील या लोकसभा मतदारसंघात आपकडून सोमनाथ भारती हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात दिवंगत सुषमा स्वराज्या यांची मुलगी बांसुरी स्वराज भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळं या मतदारसंघाची लढत देशाच्या राजकीय पटलावर सर्वांचं लक्ष वेधताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!